दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलच्या सेवकांनी, कावळ्याला दिले जीवदान...
![दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलच्या सेवकांनी, कावळ्याला दिले जीवदान...](https://news15marathi.com/uploads/images/202304/image_750x_6434ecb44b9bf.jpg)
NEWS15 प्रतिनिधी : बापू चव्हाण
नाशिक / दिंडोरी : जनता इंग्लिश स्कूलच्या माध्यमिक विद्यालयात शालेय पोषण आहाराच्या शेजारी; झाडावरती एक कावळा नॉयलन मांजात अडकून पडला होता. ही बाब शाळेतील काही विद्यार्थ्यांनी शालेय पोषण आहार विभाग प्रमुख संतोष कथार यांना सांगितली असता.! यावेळी संतोष कथार, अरुण पाटील, नामदेव जाधव, बी. आर. रायते तसेच संपत गाढवे, नागेश रसाळ यांनी विशेष परिश्रम घेत झाडावरील मांजात अडकलेल्या कावळ्यास जीवदान दिले.
झाडावर उंच ठिकाणी मांजामध्ये कावळ्याचा पाय अडकल्याने, त्या मांजातून निसटण्याचा प्रयत्न कावळा करत होता. हे बघून सर्वच जण हळहळ व्यक्त करत होते. त्या ठिकाणी शिपाई रसूल मामा यांनी मोठी (काठी) आणत काठीला चित्रकला शिक्षक एन. एम. जाधव यांनी कटर जोडून सर्वांच्या सहकार्याने कावळ्याच्या पायातील मांजा कट करून, त्या कावळ्याला मांजापासून मुक्त केले आणि लगेच कावळा आकाशात भुरकन उडून निघून गेला.
शालेय स्तरावर दिले गेलेले प्रशिक्षण पक्षी, प्राणी यांच्यासाठी असलेली प्रेम, दया हे विद्यार्थी शिक्षक व सेवक यांच्यामध्ये दिसून आले. घातक प्रसंगामुळे प्राणी व पक्षी यांची संख्या घटत चालली अशी चर्चा यावेळी रंगली होती.