खराबवाडी गावचे माजी उपसरपंच माऊली सातव व खंडू केसवड यांच्याकडून गरजूंना किराणा वाटप..
News15 प्रतिनिधी आशिष ढगे पाटील
चाकण : खेड तालुक्यातील खराबवाडी गावचे माजी उपसरपंच माऊली सातव व उद्योजक खंडू केसवड यांनी गरजू लोकांना साई मंदिर येथे किराणा मालाचे वाटप केले. सध्या देशभर कोरोंना व्हाइरस या रोगाने थैमान घातले आहे. त्यातच चाकण औद्योगिक वसाहतीतील खराबवाडी गावातील बरेच परप्रांतीय याठिकाणी कामानिमित्ताने वास्तव्यास आहे. केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे सर्व औद्योगिक वसाहत ठप्प झाली आहे आणि याच मूळे कामगारांच्यावर उपास मारीची वेळी आली आहे. त्याचाच भाग म्हणून आज सातव इस्टेट याठिकाणी साई मंदिर याठिकाणी ५० गरजू लोकांना किराणा मालाचे वाटप केले आहे. माजी उपसरपंच माऊली सातव व उद्योजक खंडू केसवड यांनी गरजूंना किराणा मालाचे वाटप करून 4 बांधिलकी जपल्याने नक्कीच असे निराधार कुटूंबाना आपुलकीचा आधार मिळाल्या शिवाय राहणार नाही. विशेष म्हणजे उद्योजक खंडू केसवड यांनी त्यांच्या स्वतःच्या २२ रुमांचे भांडे घेणार नसल्याचे सांगितले. यावरून नक्कीच समाज्यात माणसातील माणुसकी शिल्लक असल्याचे दिसत आहे. यावेळी साई मंदिराचे पुजारी अशोक महाराज पुरी, ज्ञानेश्वर पोखरकर, कोंडीबा ताठे, जमनाजी पुरी, संदीप भारती असे अनेक साईभक्त याठिकाणी सोशल डिस्टस्टंट ठेऊन उपस्थित होते.