किनगावचे सुपुत्र बाळू आमले; हे महात्मा फुले राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित.!

किनगावचे सुपुत्र बाळू आमले; हे महात्मा फुले राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्काराने सन्मानित.!

NEWS15 प्रतिनिधी : असलम शेख

लातूर : सर्व सामन्य कुटुबातील समाज सेवेचे वृत अंगी बाळगून सतत कामात धडपडणारे व्यक्तीमत्व अहमदपुर तालुक्यातील किनगावचे सुपुत्र बाळू आमले महात्मा फुले राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित झाल्यामुळे त्यांचे कौतुक व अभिनंदन सर्वत्र होत आहे.

बाळू आमले हे लहान मुर्ती पण किर्ती महान याप्रमाणे समाजात शेतक-यांचे प्रश्न असो की, दिव्यांग, निराधार, कामगार कल्याण मंडळातील कामे हे गोरगरीबांचे ते त्यांच्या न्याय हक्कासाठी सतत धडपड करून प्रश्न सोडवित असतात त्यांनी शासकिय कार्यालय,दवाखाना आदी परिसरातील गरजूवंताच्या कामात मदत करत असतात. या कार्याची दखल घेऊन बाळू जनार्धन आमले यांना महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य,श्री संत शिरोमणी सावता माळी सेवा भावी संस्था भादा यांच्या वतीने हा राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

हा पुरस्कार दि ९ एप्रिल रोजी सकाळी ११.०० वाजता महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य पदाधिकारी मेळवा विश्व पॅलेस मंगल कार्यालय, लातूर येथे दिला असून सर्व किनगाव प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते,मित्रमंडळाच्या वतीने अभिनंदन होत आहे.