कंरजी येथील पांडुरंगाचे मंदिर भाविकांचे आशास्थान...

कंरजी येथील पांडुरंगाचे मंदिर भाविकांचे आशास्थान...

NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण

दिंडोरी तालुक्यांला धार्मिक वारसा हा मोठ्या प्रमाणावर लाभला असुन पावसाळ्यात तालुक्यातील अनेक धार्मिक स्थळांना जणू यात्रेचे स्वरूप येते.

तालुक्यात वणीचा गड,दिंडोरी येथील स्वामी समर्थ महाराज मंदिर,देवघर येथील भगवान शिव मंदिर,तसेच कंरजीयेथील अनेक कलाकृतीनी नविन्यपुर्ण आकर्षक असे पांडुरंगाचे मंदिर हे सध्या आषाढ महिन्यात भाविकांच्या मनातील भक्तिभावनेचा केद्र बिंदु बनले आहे. त्यामुळे येथे या महिन्यात भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणावर मांदीआळी पाहायला मिळते. " ज्यांनी नाही पाहिली पंढरी त्यांनी पाहावी दिंडोरी!"हे जून्या जाणकार नागरिकांचे शब्द हे खरे ठरतांना दिसत आहे. दिंडोरी तालुक्यातील दिंडोरी वणी रस्त्यावर घनदाट करवंदाची झाडी,डोंगर माथा परिसर,निसर्गाने केलेली मुक्त उधळणं,एकांत भाग इ.मुळे अनेक भाविक भक्तांना हा मंदिर परिसर धार्मिक साधनेसाठी महत्त्वाचा मानला गेला आहे. याठिकाणी काही आधिकारी साधु महंतांच्या पुरातन समाधी स्थळ पाहायला मिळतात.याठिकाणी देवांना स्नान घालण्यासाठी गंगेचे अवतरणं आहे.त्यांचा पुरावा म्हणून येथे जेथून आजही कायम स्वरूपी पाणी वाहाते त्या गंगेमातेचे मंदिर भाविक भक्तांना भुरळं घालते.

 करंजी येथे दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे अतिशय पुरातन असणारे व कलाकृतीने तयार केलेले पांडुरंगाचे मंदिर म्हणजे साक्षात पंढरपूर चे मंदिर मानले जाते.ज्या ज्या भाविक भक्तांना आपल्या काही अडचणी मुळे आषाढी  कार्तिकी एकादशीला पंढरीला जाता येत नाही.असे भाविक भक्त आषाढ महिन्यात कंरजी येथे येऊन मनोभावे या मंदिरात येऊन दर्शनाचा लाभ घेतात.

पुर्वी येथे कोकण,खानदेश, मधील काही वारकरी आपल्या दिंड्या घेऊन श्री क्षेत्र कंरजी येथे येत असतं.परंतु काळाच्या ओघात त्या दिंड्या आता बंद झाल्या आहेत.परंतु येथे आजही विविध धार्मिक कार्यक्रमाचे वार्षिक नियोजन हे केलेले असते.त्यामध्ये सप्ताह,दत्त जन्मोत्सव,समाधी वर्धापन दिन साजरे होत असतात.त्यामुळे हे क्षेत्र आजही महाराष्ट्रांच्या कान्याकोप-यात एक धार्मिक स्थळ म्हणून नावारूपाला आलेले आहे.त्यामुळे येथे अनेक उत्सवांसाठी अनेक भाविक भक्तांची मोठी मांदीआळी येत असते.व दर्शन घेऊन आनंदाने आपल्या घरी जात असतात.

.......●●चौकट●●.....

पर्यटन क्षेत्रांचा दर्जा मिळण्याची मागणी 

दिंडोरी तालुक्यातील धार्मिक क्षेत्रातील एक मानांचा तुरा म्हणून कंरजी येथील धार्मिक क्षेत्राकडे पाहिले जाते.परंतु या क्षेत्राला अजून प्रगतीसाठी काही शासकीय मदतीची गरज असुन त्या प्रतिक्षेत हे स्थान सध्या आपल्याला दिसत आहे. जर मोठ्या प्रमाणावर शासकीय मदत या क्षेत्राला मिळाली तर या क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणावर धार्मिक विकास होईल असे अनेकांनी प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले.यासाठी या क्षेत्राला पर्यटन क्षेत्राचा दर्जा मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

यासाठी लोकप्रतिनिधीनी पुढाकार घ्यावा व या धार्मिक क्षेत्राला पर्यटन क्षेत्र दर्जा मिळुन देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे बनले आहे. निवडणूका आल्या की प्रत्येक उमेदवार निवडून येण्यासाठी याठिकाणी येऊन येथील देवांना साकडे घालतात.परंतु निवडणूक संपली की याक्षेत्राकडे अनेक जण कानाडोळा करतात.त्यामुळे हे पवित्र धार्मिक क्षेत्र अनेक विकास कामांपासुन वंचित राहिले आहे. ही एक दुर्दैवांची गोष्ट म्हणावी लागेल. यासाठी या क्षेत्राला पर्यटन क्षेत्रांचा दर्जा मिळण्यासाठी लोकप्रतिनिधी नी लक्ष देण्याची गरज आहे.अशी मागणी समस्त भाविक भक्तांकडून होत आहे.