किनगाव येथील पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न...

किनगाव येथील पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक संपन्न...

NEWS15 मराठी प्रतिनिधी -  असलम शेख, लातूर

अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील पोलीस ठाण्यात; आगामी गणेश उत्सव, पोळा आणि ईद ए. मिलादुन नबी निमित्त उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कल्याणकर, सहायक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता समितीची बैठक घेण्यात आली. दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

सण उत्सवाबाबत पोलिस उपविभागीय अधिकारी मनीष कल्याणकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंदारे, उपसंरपच विठ्ठलराव बोडके, माजी संरपच किशोर मुंडे, माजी जि. पं सदस्य त्र्यंबक गुट्टे यांनी मार्गदर्शन केले. तर या काळात सर्व समाज बांधवांनी नियमांच्या आधीन राहून आपआपले सणउत्सव पार पाडावे व शांतता राखावी असे आवाहन यावेळी करण्यात आले.