सावधान.! हवामान विभागाचा आज पुन्हा: गारपीट व अवकाळी पावसाचा इशारा, ह्या जिल्ह्यांना अलर्ट...

सावधान.! हवामान विभागाचा आज पुन्हा: गारपीट व अवकाळी पावसाचा इशारा, ह्या जिल्ह्यांना अलर्ट...

NEWS15 मराठी रिपोर्ट - पुणे

मागील काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने, लाखो शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. हातचे आलेले पीक पाण्यात जात असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तर पुन्हा: बंगालच्या उपसागरात मिचांग हे चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता असल्याने, या चक्रीवादळामुळे अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात गेलीय. तर पुढील 3 दिवस राज्यात पाऊस आणि वादळी वाऱ्याचा इशाराही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं  मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे हिरावला आहे. उभी पिकं आडवी झाली आहे. मात्र शेतकऱ्याचं संकट इथंच संपलेलं नाही. कारण राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

हवामान विभागाने राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना हवामान विभागाने आज यलो अलर्ट दिला आहे.

या जिल्ह्यांमध्ये विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. तसेच रायगड, ठाणे, जालना आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या सरी पडतील, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.