श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा सात वर्षीय अथर्व पाखले...

श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारा सात वर्षीय अथर्व पाखले...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

येवला तालुक्यातील नागडे येथील पाखले कुटुंबातील सात वर्षीय चुमुकला अथर्व पराग पाखले आपल्या मधुर आवाजात भजन गात सर्वांना मंत्रमुग्ध करून टाकतो. नुकताच नवरात्रोत्सवानिमित्त कोटमगाव येथे जगदंबा माता मंदिर आवारात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमा अंतर्गत हनुमान भजनी मंडळमध्ये भजन सादर केल्यानंतर त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.

येवला येथील स्वामी मुक्तानंद विद्यालय प्राथमिक विभाग,हुडको . येथे इयत्ता दुसरीमध्ये अथर्व पराग पाखले हा शिक्षण घेतो.आजोबा निवृत्त प्राध्यापक एकनाथ पाखले यांना तबला वादनाची आवड आहे. त्याचबरोबर ते उत्तम प्रवचनकार देखील आहेत.त्यांनी त्यांच्या आवडीतुनच आपली दोन्ही मुले पंकज व पराग यांना संगित विशारद बनवले.अवघे कुटुंबालाच धार्मिकतेची आवड.आजी - आजोबा,काका वडील  यांच्या सोबत सप्ताह,हरिपाठ यामध्ये सहभागी होतांना अथर्वला भजनाची आवड लागली.लहान वयातच भजने पाठ करून तो आपल्या आवाजात सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून आहे.  

यावर्षी येवला तालुका अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शालेय स्पर्धेमधील देखील तालुकास्तरावर गीत गायनामध्ये अथर्व पाखले याने प्रथम क्रमांक मिळवला आहे.नुकतेच कोटमगाव येथे नवरात्रोत्सव निमित्त जगदंबा माता मंदिर आवारात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमा अंतर्गत हनुमान  भजनी मंडळ मध्ये अथर्व पाखले याने भजन सादर केले.मधुर आवाजात त्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकले.‌तसेच यावेळी त्याने पोवाडा देखील सादर केला.त्याच्या या सादरीकरणामुळे त्याचे परिसरातून कौतुक होत आहे.यावेळी जगदंबा माता ट्रस्टच्यावतीने अथर्व चा सत्कार करण्यात आला असून जादुई आवाजाने अनेक भाविकांना भुरळ घालत असून येणाऱ्या काळामध्ये वारकरी संप्रदायाची परंपरा व पताका फडकवल्याशिवाय अथर्व पालखे राहणार नाही अशा चर्चेतून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.