नवेगावबांध येथे पोलीस विभागाच्यावतीने, पोलीस स्मृती दिन साजरा...

नवेगावबांध येथे पोलीस विभागाच्यावतीने, पोलीस स्मृती दिन साजरा...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर, सडक अर्जुनी

21 ऑक्टोबर हा दिवस सर्वत्र पोलीस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशासाठी आपले कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर पोलिसांचे स्मरण ठेवण्यासाठी तसेच पोलिसांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 21 ऑक्टोबर रोजी पोलिस स्मृतिदिन साजरा केला जातो.

याच दिनानिमित्त; पोलीस स्टेशन नवेगावबांध'च्यावतीने दि. २१ ऑक्टोबर २०२३ रोजी नवेगावबांध येतील महाविद्यालयात सकाळी ९.३० वा. पोलीस स्मृती दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात शहीद पोलीस उपनिरीक्षक दीपक रहिले  यांच्या पुतळ्याचे पूजन करून सुरुवात करण्यात आली. तसेच शहीद पोलिसांप्रती 2 मिनिटाचे मौन धारण करून, श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी शहीद पोलीस उपनिरीक्षक दिपक रहिले यांच्या कुटुंबीयांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व शहीद पोलिस यांच्या स्मृतीना उजाळा देऊन हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. या वेळी पोलीस स्टेशन नवेगावबांध येथील पोलीस निरीक्षक, सर्व पोलीस कर्मचारी, ग्रामस्थ व शाळकरी विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.