पुलावरील कठड्या अभावी महिलेने गमावला जीव...

पुलावरील कठड्या अभावी महिलेने गमावला जीव...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, बल्लारपूर

पुलाच्या कठड्या अभावी एका गर्भवती महिलेला आपल्या प्राणास मुकावे लागल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार बल्लारपूर येथे काल दि.20 ऑक्टोबर रोजी दुपारच्या दरम्यान घडला आहे. बल्लारपूर शहरातील बामनी येथे वास्तव्यास असलेल्या पुष्पा काकडे या आपल्या मुलाला चॉकलेट घेऊन देण्यासाठी स्कुटीने घराबाहेर पडल्या. पण त्या परत न आल्याने त्यांच्या घरच्यांनी त्यांचा शोधाशोध सुरु केला. त्यानंतर त्यांच्या घरच्यांनी पोलीस स्थानकात देखील तक्रार नोंदवली. शोधाशोध सुरु झाल्यानंतर पहाटे वर्धा नदीच्या पुलाखाली मुलाच्या रडण्याचा आवाज आला. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यावेळी पुष्पा या मृतावस्थेत आणि त्यांना कवटाळून बसलेला चार वर्षांचा मुलगा सापडला.

या संपूर्ण घटनेमुळे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये दु:खासह संताप देखील व्यक्त केला जात आहे.

दरम्यान या पुलाला कठडे नसल्याने हा अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती असून, अनेक अपघातांचं सत्र या पुलावर सुरु असल्याचे म्हंटले जात आहे. परंतु तरीही या पुलाच्या दुरुस्तीचे काम होत नसल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यातच आता यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे पुन्हा एकदा या पुलाच्या प्रश्नावरुन गावकरी संतप्त झाल्याचं म्हटलं जात आहे.