जन्मदात्या बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार.! आरोपीला बापाला अटक... मुलगी गर्भवती...

जन्मदात्या बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार.! आरोपीला बापाला अटक... मुलगी गर्भवती...

प्रतिनिधी - साहिल रामटेके, गोंदिया

सडक अर्जुनी तालुक्यातील एका गावात मानवीयतेला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या बापानेच स्वतःच्या पंधरा वर्षीय मुलीवर जबरदस्ती केल्याचा धक्कादायक प्रकार प्रकाशात आला असून, त्या अत्याचारातून मुलीला दिवस गेल्याचे उघडकीस येताच संपूर्ण जिल्ह्यात संतापाची ठिणगी पडली आहे.

“हा बाप आहे की हैवान?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत असून, आरोपीला फाशी द्या अशी जोरदार मागणी सुरू झाली आहे.

पीडित मुलीची आई आरोपीच्या वाईट वागणुकीमुळे अंदाजे दहा वर्षांपासून माहेरी राहत आहे. त्यामुळे मुलगी, मुलगा आणि आरोपीची आई हे तिघे आरोपीसोबत राहत होते. मुलगी लहान असल्याने ती वडिलांसोबतच झोपत होती. याच संधीचा गैरफायदा घेत आरोपी बापाने मुलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे.

काही महिन्यांपासून पोटदुखीची तक्रार वाढल्याने मुलीला गोंदिया येथील महिला रुग्णालयात तपासणीसाठी आणले असता; तिला दिवस गेल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यानंतर तात्काळ डुग्गीपार पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध POCSO कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे.

घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश वनारे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली पवार करीत आहेत.

या प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे. अत्याचार करणाऱ्या या नराधम बापाला फाशीची शिक्षा देऊन आदर्श शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.