राजकीय : चाकण नगरपरिषदेच्या निवडणूकीतील वॉर्ड क्रमांक ७ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा सुयोग शेवकरी यांची बिनविरोध निवड..!

राजकीय : चाकण नगरपरिषदेच्या निवडणूकीतील वॉर्ड क्रमांक ७ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्षा सुयोग शेवकरी यांची बिनविरोध निवड..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : चाकण नगरपरिषद निवडणुकीत वॉर्ड क्रमांक ७ मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अँड. वर्षा सुयोग शेवकरी यांची बिनविरोध निवड झाली आहे.

या वॉर्डातुन शिंदे शिवसेनेच्या उमेदवार पल्लवी निलेश टिळेकर यांनी बिनशर्त पाठिंबा दिल्याने वर्षा सुयोग शेवकरी यांची नगरसेविका म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. मोठ्या जल्लोषात वर्षा शेवकरी यांचे स्वागत करण्यात आले. सध्याची परिस्थिती बघता अर्ज माघारीच्या पहिल्या दिवशी शिंदे शिवसेनेचे वॉर्ड क्रमांक ५ नितीन गुलाब गोरे आणि वॉर्ड क्रमांक ७ मधून वर्षा सुयोग शेवकरी तर वॉर्ड क्रमांक १० मधून प्रकाश राजाराम भुजबळ या तीन जागा शिवसेना पक्षांकडून एक तर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.

अजूनही माघारीचा एक दिवस बाकी असताना अजून किती जागा कोणत्या पक्षाच्या बिनविरोध निवडून येतात हे पहावे लागेल..