कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक व युवा उद्योजक हरिष बन्सोड यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - सुधीर शिवणकर (सडक अर्जुनी)
सडक अर्जुनी कृषि उत्पन्न बाजार समितिचे संचालक, सावंगी येथील युवा उद्योजक हरिष बन्सोड यांनी आज; महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रांताध्यक्ष नाना भाऊ पटोले यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, मुंबईच्या प्रदेश कार्यालयात कांग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश महासचिव देवानंद पवार उपस्थित होते.
ते मागील काही वर्षांपासून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करीत होते. मात्र भाजपाची विचार धारा बहुजन समाजाचा घात करणारी असल्यामुळे; आज भाजपाचा त्याग करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याचे त्यांनी म्हंटले.

प्रसंगी सडक अर्जुनी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, प्रदेश प्रतिनिधी दामोदर नेवारे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक रोशन बडोले, सामाजिक कार्यकर्ते शंकर मेंढे, चिखली ग्रामपंचायत चे माजी सरपंच सुधाकर कुर्वे, सुमेध बन्सोड प्रामुख्याने उपस्थित होते.