दिंडोरी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसची बैठक उत्साहात संपन्न...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या सर्व सेलची आढावा बैठक नाशिक जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय पाटील, नाशिक शहराध्यक्ष गजानन शेलार, प्रदेश युवक कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक,गोकुळ पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी जिल्ह्याची जबाबदारी दिलेल्या सर्व मान्यवरांचा तालुक्याच्यावतीने सत्कार करण्यात आला. जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून दिंडोरी लोकसभा मतदार संघाची संपूर्ण जबाबदारी दिलेल्या दिंडोरी तालुक्याचे भूमिपुत्र, खेडगावचे सरपंच दत्तात्रय पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी तालुक्यातील सर्व गावांमधून शरद पवार यांच्यावर प्रेम करणारी सर्व स्तरावरील मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठकीचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष भास्कर भगरे यांनी केले. या बैठकीमध्ये पक्ष बांधणी, आगामी निवडणुका, तालुक्यातील अडीअडचणी तालुक्याच्यावतीने विठ्ठल संधान, सुदाम बोडके, अशोक नाईकवाडे, बाळासाहेब महाले, सुरेश पाटील, राहुल उगले, साहेबराव पाटील, नरेश देशमुख, ज्ञानेश्वर भोये, सौ.संगीता पाटील, शैला उफाडे आदींनी आपले विचार मांडले. गजानन शेलार, पुरुषोत्तम कडलक, गोकुळ पिंगळे, दत्तात्रय पाटील, शाम हिरे यांनी आपल्या मनोगतातून शरद पवार यांनी कृषिमंत्री म्हणून शेतकऱ्यांसाठी जे कार्य केले, त्यातून दुसरी हरितक्रांती घडविण्याचे काम केले. इतिहासातील ७२००० कोटींची कर्जमाफी केली. महिलांसाठी ५०% आरक्षण त्यांनी महाराष्ट्रात सुरु केले. देशात सर्वात अगोदर महाराष्ट्रात आदिवासींसाठी स्वतंत्र आदिवासी विकास विभागाची स्थापना करून बजेटमधून लोकसंख्येएवढी ९% रकमेची तरतूद केली. सर्व समाजाला न्याय देण्याचे काम केले. त्यांचे विचारकार्य तळागाळापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी जाणीव त्यांनी सर्वांना करून दिली.
अध्यक्षीय भाषणात कोंडाजी आव्हाड यांनी दिंडोरी तालुका शरद पवार यांना मानणारा तालुका आहे. आजपर्यंत अपवाद वगळता त्यांच्याच विचाराचा आमदार तालुक्याला दिलेला आहे. आगामी निवडणुकांमध्ये शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावेअसे आवाहन केले. सदर बैठकीचे सूत्रसंचालन युवक जिल्हाध्यक्ष शाम हिरे यांनी केले तर आभार युवक विधानसभा अध्यक्ष संतोष रेहरे, मनोज थोरात यांनी मानले.
यावेळी तालुक्यातून कादवाचे संचालक मधुकर गटकळ, विश्वनाथ देशमुख, त्र्यंबक संधान, साहेबराव पाटील, रघुनाथ पाटील, नामदेव धात्रक, फकीर देशमुख, शंकर काठे, महेंद्र बोरा, राजेंद्र ढगे, अनिल देशमुख, वसंत जाधव, मच्छिंद्र पवार, नरेंद्र पेलमहाले, नवनाथ नाठे, जयवंत जाधव, रघुनाथ पाटील, तुषार वाघ, चंदर भोये, प्रमोद मुळाने आदी उपस्थित होते.
न्यूज 15 मराठी प्रतिनिधी बापू चव्हाण नाशिक