नागपूर शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान.! २२ उमेदवार रिंगणात...

नागपूर शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान.! २२ उमेदवार रिंगणात...

NEWS15 प्रतिनिधी : साहिल रामटेके

नागपूर शिक्षक मतदार संघासाठी आज मतदान पार पडत असून, या निवडणुकीत एकूण २२ उमेदवार रिंगणात आहेत. गोंदिया जिल्ह्यात १० मतदान केंद्रावर हे मतदान होत आहे.

गोंदिया विधानपरिषदेच्या नागपूर शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी आज सोमवार ३० जानेवारी २०२३ रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीत ३८८१ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये स्त्री मतदार १२१८ तर पुरुष मतदार २६६३ आहेत. मतदानाची वेळ सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत असणार आहे.