खासदार नवनीत राणा यांना कोर्टाचा दणका.! जात पडताळणी प्रकरणात वडील फरार...
NEWS15 प्रतिनिधी - अमरावती : जात पडताळणी प्रकरणात शिवडी न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांना पुन्हा: एकदा धक्का दिला आहे. शिवजी महानगर दंडाधिकारी कोर्टाने खासदार राणा यांना हा दणका दिलाय.
सविस्तर घटना अशी की, जात पडताळणी प्रकरणात खासदार नवनीत राणा यांचे वडील हरभजन सिंग कौर यांना शिवडी कोर्टाकडूनफरार म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच नवनीत राणा व त्यांचे वडिल हरभजन सिंग कौर यांना न्यायालयाने दंड ठोठावला असून, 1 हजार रुपयांचा हा दंड कोर्टाने ठोठावला आहे.
तसेच प्रीम कोर्ट आणि मुलुंड पोलीस स्टेशनमध्येदाखल केलेलं प्रकरण दोन्हीही वेगवेगळे असल्याचं निरीक्षण शिवडी कोर्टाने नोंदवलं असून, कोर्टाने आता एक महिन्याची मुदत दिली आहे. या कालावधीत हजर न झाल्यास प्रॉपर्टी जप्त करण्यात येण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर याप्रकरणाची पुढील सुनावणी 16 फेब्रुवारी तोजी होणार आहे.