देशाची अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवर - केंद्रिय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड

देशाची अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवर - केंद्रिय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड

NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

देशाची अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवर केंद्रिय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड.अहमदपूर तालुक्यातील चिखली येथे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुतन विस्तारीत कक्षाचा उदघाटन सोहळा निमित्ताने बोलतांना देशाची अर्थव्यवस्था पाचव्या नंबरवर असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.पुढे बोलतांना म्हणाले की,चिखली गावची आर्थिक परिस्थिती चांगली असून शिक्षण, शेती, उदयोग व्यवसायासाठी या बँकेमुळे मदत होणार आहे.देशात ५४ कोटी जनधन खाते ० बॅलन्स वर काढण्यात आली तर या खात्यावर २ लाख ७० हजार दर राशी बॅलन्स उपलब्ध झाले असेही मत व्यक्त केले.

लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुतन विस्तारीत कक्षाचा उदघाटन सोहळा केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवतजी कराड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सहकार महर्षी दिलीपराव देशमुख प्रमुख पाहुणे आ.बाबासाहेब पाटील,आ धीरज देशमुख, माजि आ.बब्रुवान खंदाडे, सर्व संचालक मंडळ, सरपंच,उपसरपंच सोसायटीचे चेअरमन, बँकेला भाडेतत्वावर जागा देणार तुकराम जाधव पाटील,सदाशिव जाधव पाटील, द्वारकादास शामकुकार वस्त्र दालन मराठवाडा ग्रुप यांनी दिले व सर्व गावकरी मंडळी या कार्यक्रमास  उपस्थित होते.प्रस्थाविक मनोगत जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज देशमुख तर अभार ॲड.प्रमोद जाधव यांनी मानले.