फडणवीस यांच्या मनधरणीला यश.! एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय...

फडणवीस यांच्या मनधरणीला यश.! एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय...

NEWS15 मराठी - रिपोर्ट - मुंबई

अनेक नाट्यमय राजकीय घडमोडीनंतर अखरे आज सरकार स्थापन होणार असून, नाराजी नाट्याच्या चर्चेलाही पूर्ण विराम मिळाला असल्याने सांगण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीला यश आलं असून,  एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या शब्दाला होकार देत मोठा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. अशातच आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार की नाही यासंदर्भात अनेकजण संभ्रमात आहेत. मात्र आता देवेंद्र फडणवीस यांच्या मनधरणीला देखील यश आलं आहे. त्यामुळे आता एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत असं सांगितले जात आहे.

आज होणाऱ्या शपथविधीला देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे हे गृहखात्याच्या मागणीवर अडून बसल्यामुळे महायुती सरकारच्या शपथविधीवर टांगती तलवार होती. मात्र या शपथविधी सोहळ्यात फडणवीस आणि अजित पवार हे शपथ घेणार की काय? असं चित्र दिसत होत.

मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांनी सर्व राजकीयदृष्ट्या एकनाथ शिंदे यांची मनधरणी केली असून, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्यास ते राजी झाल्याचं सांगितलं जात आहे.

नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळ्याला आज सायंकाळी 5 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे. यानंतर संध्याकाळी 5.30 वाजता भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत.