भाजप जिल्हाउपाध्यक्ष मळसिध्द मुगळे यांच्या विकास संवाद यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद...

भाजप जिल्हाउपाध्यक्ष मळसिध्द मुगळे यांच्या विकास संवाद यात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद...

प्रतिनिधी - महेश पवार, सोलापूर

भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष मळसिध्द मुगळे यांनी काही दिवसांपूर्वी मंद्रुप चे ग्रामदैवत श्री मळसिध्दप्पा मंदिरात आगामी दक्षिण सोलापूर मतदार संघातून भारतीय जनता पार्टी कडून विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याची इच्छा व्यक्त केली होती.

त्याच अनुषंगाने त्यांनी गुरुवारी 18 सप्टेंबर 2024 रोजी गावभेट दौऱ्यास प्रारंभ केला.

या दौऱ्याची सुरुवात विकास संवाद यात्रेच्या माध्यमातून हत्तुर येथे सकाळी 11/30 वाजण्याच्या सुमारास हत्तुर चे ग्रामदैवत श्री सोमेश्वर मंदिरात श्री सोमेश्वर महाराजांचा आर्शिवाद घेऊन तेथुन विकास संवाद यात्रेस प्रारंभ केला.

हत्तुर च्या ग्रामस्थमंडळी कडून भाजप चे जिल्हाउपाध्यक्ष मळसिध्द मुगळे यांच्या जाहिर सत्कार करण्यात आला.

हत्तुर वडकबाळ वांगी मनगोळी गावडेवाडी अकोले मंद्रुप गुंजेगाव वडापूर अंत्रोळी या गावातील ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन 

विकास संवाद यात्रेचा प्रारंभ केलेला होता याच वेळी भाजप चे जिल्हाउपाध्यक्ष मळसिध्द मुगळे यांचा वरील गावातील ग्रामस्थ मंडळींकडून यथोचित सत्कार करण्यात आला.