विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागावे - खासदार भगरे

विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनी कामाला लागावे - खासदार भगरे

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक 

महायुती सरकारबद्दल जनतेमध्ये प्रचंड रोष असून त्याचा प्रत्यय जनतेने लोकसभेत दाखवून देत महा विकास आघाडीला मोठे यश दिले. त्याप्रमाणेच येत्या विधानसभा निवडणुकीत ही जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी असून पक्ष जो उमेदवार देईल तो निवडून आणण्यासाठी सर्वांनी कामाला लागावे तसेच शिव स्वराज्य यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन खासदार भास्कर भगरे यांनी केले.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,खासदार अमोल कोल्हे यांचे नेतृत्वात दि.२४ सप्टेंबर रोजी शिवस्वराज्य यात्रा येत असून दिंडोरी येथील संस्कृती लॉन्स येथे सभा होत आहे.या यात्रेच्या पूर्व तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक परमोरी येथील ओम साई लॉन्स येथे आज शनिवार दि.२१ रोजी जेष्ठ नेते तथा कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांचे अध्यक्षतेखाली झाली.त्यावेळी खासदार भगरे बोलत होते.

यावेळी बोलताना जेष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची शिव स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्नांवर चर्चा होत आहे.लोकसभा निवडणुकीत जनशक्तिने सर्वसामान्य जनतेचे प्रतिनिधी म्हणून भास्कर भगरे यांना निवडून दिले त्यांनी अत्यंत कार्यक्षम पने कामकाज सुरू केले असून ते जनतेचे प्रश्न सोडवत आहे. नार पार प्रकल्पात पाणी तालुक्यातील धरणात आणणे धरण जोड प्रकल्प राबविणे आदींसाठी लोकप्रतिनिधी विधानसभेत ही हवे यासाठी सर्वांनी विधानसभा निवडणुकीत हेवेदावे विसरून एकदिलाने काम करत विजयासाठी प्रयत्न करावे असे सांगितले.

यावेळी कार्याध्यक्ष दत्तात्रेय पाटील म्हणाले की सरकारच्या तिजोरीत पैसा नसतांनाही जनतेची दिशाभुल करुन फक्त सत्तेसाठी घोषणांचा पाऊस पाडत आहे मागील योजनांचे अद्याप पैसे मिळालेले नाही. जनस्वराज्य यात्रेतून सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला जात असून या यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन दत्तात्रेय पाटील यांनी केले.

यावेळी दत्तात्रेय पाटील,बाजार समिती सभापती प्रशांत कड,युवक जिल्हाध्यक्ष शाम हिरे,विलास पाटील,राजू देवरे,राजेंद्र ढगे,तुकाराम जोंधळे,प्रा.अशोक बागुल,मनोज खांदवे,नरेश देशमुख,शिवाजी फलाने पेठ तालुकाध्यक्ष दामू राऊत,शैलाताई उफाडे,सचिन कड,संतोष रेहरे,रघुनाथ पाटील,गोरख धात्रक आदींनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी वणीचे सरपंच मधुकर भरसट,बाळासाहेब जाधव,अनिल देशमुख,गंगाधर नीखाडे,दिनकर जाधव,नामदेव घडवजे,रामदास पाटील,रावसाहेब पाटील,दत्तू भेरे,पांडुरंग गडकरी,गिरीश गावित,राहुल उगले,छबू मटाले ,निवृत्ती घुमरे आदींसह राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.