राजकीय : खेड तालुक्यात माजी आमदार यांना धक्का, पश्चिम पट्ट्यातील मोठा नेता महाविकास आघाडीच्या गळाला..!

राजकीय : खेड तालुक्यात माजी आमदार यांना धक्का, पश्चिम पट्ट्यातील मोठा नेता महाविकास आघाडीच्या गळाला..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : खेड तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील आदिवासी नेते आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती विठ्ठल वनघरे यांना महाविकास आघाडीकडून थेट जिल्हा परिषदेची उमेदवारी आमदार बाबाजी काळे यांनी जाहीर केल्याने पुन्हा एकदा माजी आमदार दिलीप मोहिते यांना मोठा धक्का मानला जात आहे.

मागील काही दिवसापासून विठ्ठल वनघरे हे कोणत्याही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमाला दिसत नव्हते याचीही चर्चा तालुक्यात रंगली होती. त्यातच मागील लोकसभेपासून खेड तालुक्यात निर्माण झालेले महाविकास आघाडीचे वातावरण बघता तसेच वातावरण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतही तसेच राहील असा कयास बांधला जात आहे. त्यामुळे अनेक महायुतीतील इच्छुक उमेदवार यांनी महाविकास आघाडीत सामील होण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. तोच धागा पकडून आणि आदिवासी बांधवांच्या आग्रहास्तव खेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि विद्यमान संचालक विठ्ठल वनघरे यांनी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचा विचार घेऊन महाविकास आघाडीत प्रवेश केला आहे. 

आजच्या खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला शेतमालाचे उघड लिलाव पद्धतीने खरेदी विक्री व्यवहाराचा भव्य उदघाटन समारंभाच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमात उदघाटक म्हणून खेड-आळंदि विधानसभेचे आमदार बाबाजी काळे यांनी भाषणात थेट विठ्ठल वनघरे यांची उमेदवारी जाहीर करून टाकली. काय जी मदत लागेल ती सगळी मदत आम्ही करून तुम्हाला निवडून आणण्याचा शब्द बाबाजी काळे यांनी जाहीर सभेत विठ्ठल वनघरे यांना दिला.

विठ्ठल वनघरे यांना तन, मन, धन सगळी मदत करून आम्ही त्यांना सर्व पक्षीय आघाडीत घेऊन निवडणूक आणणार असल्याचे सुतोवाच आमदार बाबाजी काळे यांनी केल्याने ही घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दृष्टीने धक्का मानला जात आहे. महायुतीतील एक एक नेता सोडून जात असल्याने खेड तालुक्यातील महायुती खिळखिळी झाल्याचे चित्र निर्माण झाले असते. त्यामुळे विठ्ठल वनघरे यांच्या उमेदवारीने पश्चिम पट्ट्यात आदिवासी बांधवानच्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महायुतीच्या बाबत खेड तालुक्यातील मतदारांच्यात नाराजीचा सुर दिसून येत आहे. त्यामुळे तालुक्यातील पुढील राजकीय समीकरणे कसे बदलतात हेच पहावें लागेल.