प्रा. राजन नायर यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या राज्य सरचिटणीस पदी निवड...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - विश्वनाथ केसवड, पुणे
राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) पार्टीच्यावतीने राज्य सरचिटणीस पदाची नुकतीच निवड करण्यात आली आहे. राज्य सरचिटणीस पदी विविध क्षेत्रात व सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे; पिंपरी चिंचवड कार्यकारी समिती सदस्य प्रा. राजन नायर यांची राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या राज्य सरचिटणीस पदावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याव्दारे नियुक्ती करण्यात आली.
यावेळी माजी मंत्री आमदार राजेश टोपे, आमदार जितेंद्र आव्हाड, महेबुब शेख, सुनील गव्हाणे, इम्रान शेख, देवेंद्र तायडे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी प्रा. राजन नायर म्हणाले की, माझ्यावर सोपवलेली जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे व विश्वासू पणे पार पाडत; पार्टीला आणखी मजबूत करण्यासाठी प्रयत्न करीन. तसेच राज्याचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष जयंत पाटील यांनी राजन नायर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.