तालुका शेतकरी सह.संघाच्या चेअरमनपदी बाळासाहेब जाधव तर व्हा. चेअरमनपदी रघुनाथ पाटील...

तालुका शेतकरी सह.संघाच्या चेअरमनपदी बाळासाहेब जाधव तर व्हा. चेअरमनपदी रघुनाथ पाटील...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण

नाशिक : दिंडोरी तालुका शेतकरी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी बाळसाहेब जाधव यांची तर व्हा. चेअरमनपदी रघुनाथ पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

शेतकरी सहकारी संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूकीत स्वातंत्र्यसैनिक रंगानाना पाटील शेतकरी विकास पॅनलनने १५ पैकी १४ जागावर निर्विर्वाद वर्चस्व प्राप्त केले. निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली चेअरमन, व्हा. चेअरमनपदाची निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यात चेअरमनपदासाठी बाळासाहेब पोपटराव जाधव यांचा तर व्हा. चेअरमनपदासाठी रघुनाथ पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांनी घोषित केले. चेअरमनपदासाठी बाळासाहेब जाधव यांना सूचक म्हणून सुनील मातेरे, अनुमोदक राहुल जाधव यांनी दिले. व्हा. चेअरमनपदासाठी रघुनाथ पाटील यांना सूचक म्हणून संतोष कथार यांनी तर अनुमोदक गुलाब जाधव यांनी दिले.

यावेळी बाळासाहेब जाधव व रघुनाथ पाटील यांची निवड होताच कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करुन गुलालाची उधळण करण्यात आली. याप्रसंगी मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक भरत कड, रघुनाथ गायकवाड, राहुल जाधव, रामभाऊ ढगे, रामदास पिंगळ, सुनील मातेरे, गुलाब जाधव, सुरेश घुमरे, धर्मराज राऊत, संतोष कथार, दिलीप जाधव, सुमन धुमने, मीना मवाळ आदी उपस्थित होते.