देशमुख यांचे विकासभिमुख सामाजिक कार्य मोठे - प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ
![देशमुख यांचे विकासभिमुख सामाजिक कार्य मोठे - प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_65ba70afa0f3a.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देशात विकास कामांचे काम सुरू असून या विकास रथात सर्वांनी सहभागी व्हावे असे सांगत ज्योती देशमुख यांचे विकासभिमुख सामाजिक कार्य मोठे आहे त्यांना भाजपाच्या माध्यमातून अधिक जनसेवा करण्याची संधी मिळणार आहे असे प्रतिपादन भाजप महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केले.
दिंडोरी तालुक्यातील लखमापुर येथे दि. ३१ रोजी येथील माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्त्या ज्योती देशमुख व कार्यकर्त्यांनी भाजप नेतृत्वावर विश्वास ठेवून महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
त्यावेळी वाघ बोलत होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मविप्रच्या माजी सरचिटणीस नीलिमाताई पवार ह्या होत्या. यावेळी प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव व मान्यवरांच्या उपस्थितीत ज्योती विजयराव देशमुख यांनी लिहिलेल्या काट्याकुट्यांचे हिंदोळे या आत्मचरित्र पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की ज्योती देशमुख यांनी गावाचा विकास करतातच व्यसनमुक्तीसाठी मोठे कार्य केले आहे त्यांना अजून काम करण्याची संधी मिळणार असल्याचे सांगितले. यावेळी बच्छाव यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ज्योती देशमुख यांचे कौतुक केले. वनी मंडळाचे तालुका सरचिटणीस निखिल देशमुख, दर्शन रोकडे, मोहन देशमुख, प्रेम गांगुर्डे, शरद देशमुख, सागर काळे, प्रवीण महाले, किरण चव्हाण, बाळासाहेब देवकर, तुषार बकरे, अक्षय घाडगे आदींचे चित्रा वाघ व बच्छाव यांनी भाजपात स्वागत केले.
याप्रसंगी भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष योगेश बर्डे, अश्विनी बोरस्ते, सोनाली राजे पवार, जयश्री अहिरराव, कविता पगार, श्याम मुरकुटे, विठ्ठल संधान, किरण तिवारी, दुर्गेश दायमा, धनंजय भालेराव, सुरेश वर्मा, अक्षय पवार, तुषार घोरपडे, मनोज भालेराव आदींसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.