नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ; उध्दव ठाकरे यांची हदगाव येथे भव्य सभा...
![नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ; उध्दव ठाकरे यांची हदगाव येथे भव्य सभा...](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_6629ca3611a5c.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली
महाविकास आघाडी आणि उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचारार्थ; हिंगोलीतील लोकसभा मतदारसंघातील हदगाव येथे दि.२४ एप्रिल रोजी दुपारी १२ वा. भव्य सभेचे अयोजन करण्यात आले होते.
यावेळी पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभेला मोठ्याप्रमाणात जनसमुदाया जमला होता.
यावेळी पक्षप्रमुख यांनी बोलाताना म्हणाले की, आता लढायच - गद्दाराना गाडायचे - महाराष्ट्र भिकेला लावायचा उद्योग धंदे पळवायचे शेतकऱ्यांना कर्जबाजारी करायचे पण महाराष्ट्र ची अस्मिता पण जिवंत राहता कामानये इथे सुध्दा मोदीचा गजर झाला पाहिजे. तो गुजरातमध्ये करा महाराष्ट्र मध्ये होणार नाही. भाजपने शिवसेनेच्या सातबाऱ्यावर खाडाखोर करत गद्दाराचे नाव लिहले पुन्हा निवडुन आले तर आमच्या सातबाऱ्यावर दुसऱ्या चे नाव टाकुन आम्हाला नकली शेतकरी म्हणतील अशी भिती शेतकऱ्यांनी मला बला बोलुन दाखवली राज्यात माविआचे ४८खासदार निवडुन येतील असे मला वाटते लोकामध्ये अशी भावना निर्माण झाली आहे हे सरकार पुन्हा सत्तेत आले तर सविधान बदलण्यात येईल गद्दारी झाली नसतीतर राज्यात आजही विकास झाला असता नांदेड माविआ चे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या प्रचारार्थ पत्रकार परिषद घेत उध्दव ठाकरेनी प्रतापराव चिखलीकर यांच्यावर टिकास्त्र डागले आहे नांदेड मध्ये झालेला चिखल आपण सर्वजण मिळुन साफ करु असे म्हणत त्यांनी वसंत चव्हाण यांचा विजय नक्की आहे असे ते म्हणाले देशात हुकुमशाही लाट निर्माण झाली शेतकऱ्यांकडे या सरकार विरोधात उत्तर आहे राज्यात ते माविआ आणि इंडिया आघाडी ला मतदान करणार आहे असे ते बोलत होते यावेळी बबनराव थोरात विरोधीपक्षनेते आंबादास दानवे , लोकसभेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हिंगोली जिल्हाप्रमुख गोपु उर्फ अजय पाटील सावंत माजीमंत्री जयप्रकाश मुंदडा वसिम देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील पदधिकारी उपस्थित होते.