राजकीय : भैरवनाथ विकास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वाकी बुद्रुक संचालकांच्या दिलेल्या राजीनामा नाट्याला नवे वळण..!

राजकीय : भैरवनाथ विकास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वाकी बुद्रुक संचालकांच्या दिलेल्या राजीनामा नाट्याला नवे वळण..!

News15 मराठी प्रतिनिधी आशिष ढगे पाटील 

चाकण : खेड तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाची समजली जाणाऱ्या भैरवनाथ विकास विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या अर्ध्याच्या वरती संचालकांनी सामुदायिक राजीनामे देऊन एकच खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे नक्की सोसायटीच्या कारभाराचे तीन तेरा वाजणार अशी चर्चा गावासह तालुक्यात रंगली होती

सोसायटीच्या संचालकाच्या सामुदायिक राजीनामा नाट्यानंतर दोन संचालकांनी राजकीय दबावापोटी दिलेले राजीनामे मंगळवार(दि. १५) रोजी स्वतः सहाय्यक निबंधक यांच्या कार्यालयात जावून सर्व शेतकऱ्यांच्या हितापोटी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी राजीनामे मागे घेऊन पुन्हा एकदा राजीनामा नाट्याला वेगळे वळण दिले आहे. त्यामुळे या राजीनामा देणाऱ्या संचालक यांच्यावर नक्की कुणाचा राजकीय दबाव होता. कि राजकारणाच्या नावाखाली कोण कुणाचा राजकीय स्वार्थ शोधत आहेत हे कळण्या अगोदरच प्रामाणिक ज्ञानेश्वर जयवंत टोपे व चंद्रभागा बबन गारगोटे यांनी आपले राजीनामे मागे घेऊन सोसायटीच्या सभासद यांचे नुकसान टाळण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या दोन संचालक यांनी आपले राजीनामे मागे घेऊन बाकीच्या राजीनामा दिलेल्या संचालक यांनाही सहकारात राजकारण नको असाच काहीसा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

यावर वाकी बुद्रुक गावात वेगवेगळ्या राजकीय चर्चा चर्चिल्या जात आहेत. काहींना सगळेच आम्हाला हवे आणि काहींना आता आम्हाला संधी हवी अशा राजकीय महत्वकांक्षे पायी सहकारातील महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या सहकारी सोसायटीचे नुकसान करण्याचा डाव टाकला असल्याची चर्चा गावातील सर्वसामान्य नागरिक बोलून दाखवत आहेत. एवढे होऊनही सोसायटीचे नुकसान टाळायचे असेल तर, राजीनामा दिलेल्या संचालक यांना सद्बुद्धी येऊन त्यांनी सोसायटीचे नुकसान टाळण्यासाठी विधायक निर्णय घ्यायला हवा अशी अपेक्षा गावातील नागरिक व्यक्त करत आहेत.