पाटणबोरी येथून भाजपाचे "गाव_चलो_अभियान"
![पाटणबोरी येथून भाजपाचे "गाव_चलो_अभियान"](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65c372287989d.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी
यवतमाळ : राजकीय वर्तुळात सध्या लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
याच पार्श्वभूमीवर भाजपकडून ५ फेब्रुवारीपासून ११ फेब्रुवारीपर्यंत गाव चलो अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत जगदंबा नगरी तसेच भाजप चा गड असलेल्या पाटणबोरीतून भाजपा'चे गाव चलो अभियान सुरु झाले. प्रवासी कार्यकर्ता, बूथ प्रमुख, युवा कार्यकर्ता यांना जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी मार्गदर्शन केले. तसेच घर चलो अभियान देखील येथून सुरु झाले.
मोदी सरकारची १० वर्षाची कामगिती घेऊन भाजपचा कार्यकर्ता गावा-गावात पोहचत आहे. तसेच भाजपाचे सरकार पुन्हा स्थापन व्हावे हा उद्देश घेऊन भाजपाचे अभियान सुरु आहे. त्याचा शुभारंभ आज पाटणबोरी येथून करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष तारेंद्र बोर्डे, जिल्हा महामंत्री रितेश परचाके, जिल्हा उपाध्यक्ष किशोर बावणे, जिल्हा उपाध्यक्ष प्रतीक कुळसंगे, तालुका अध्यक्ष सुरेश डहाके, विस्तारक दिलीप मादेश्वर, शहर अध्यक्ष बालू खांडरे, मच्छीमारसेल जिल्हा अध्यक्ष प्रदीप भानारकर, युवा मोर्चा अध्यक्ष धीरज शर्मा, एन टी जाधव, सचिव दत्ताभाऊ कोंडकर, शंकर लालसरे, शहर अध्यक्ष गजानन शिंगेवार उपस्थित होते.