शामभाऊ हिरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड...
![शामभाऊ हिरे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड...](https://news15marathi.com/uploads/images/202307/image_750x_64a7ae9b58223.jpg)
NEWS15 प्रतिनिधी - बापू चव्हाण
नाशिक - दिंडोरी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दिंडोरी तालुका अध्यक्ष श्याम भाऊ हिरे यांची; नुकतीच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलक यांच्या उपस्थितीत मुंबई येथील पक्ष कार्यालयात नियुक्ती करण्यात आली.
शाम हिरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने जिल्हाध्यक्षपदाची बढती दिली. ज्येष्ठ नेते तथा कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे दत्तात्रय पाटील तालुकाअध्यक्ष भास्कर भगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी युवकांची फळी उभारत पक्षांच्या माध्यमातून, जनतेचे प्रश्न सोडू असे हिरे यांनी सांगितले. यावेळी दिंडोरी येथे त्यांचा सामाजिक कार्यकर्ते बापू चव्हाण, भगवान गायकवाड, संदीप गुंजाळ, अशोक निकम, छबु मटाले, तोशिफ मनियार, मनोज पाटील आदींनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.