तब्बल दीड हजार लोकांना अन्नातून विषबाधा.! भाविकांना रूग्णालयात हलवले...

तब्बल दीड हजार लोकांना अन्नातून विषबाधा.! भाविकांना रूग्णालयात हलवले...

NEWS15 मराठी रिपोर्ट - नांदेड

नांदेड जिल्ह्यातील एका गावात सुमारे दीड हजार लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काहीकाळानंतर सदर नागरिकांना त्रास होऊ लागला व त्यांनंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्थानिकांच्या माहितीनुसार, नांदेड जिल्ह्यातील लोह्यापासून बारा किलोमीटर अंतरावर सावरगाव कोष्टेवाडी येथे संतश्रेष्ठ श्री. बाळुमामाचा प्रसाद म्हणून भाविकांना उपवासाची भगर (खीर) मंगळवार दि. 06 रोजी सायंकाळी सात ते आठच्या दरम्यान वाटप करण्यात आला होता. मामांचा प्रसाद असल्याने, मोठ्या संख्येने भाविकांनी हा प्रसाद सेवन केला. माञ बुधवारी पहाटेपासून त्यांना मळमळ होणे, उलट्या होणे, चक्कर येणे असे प्रकार सुरू झाले.

यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून यातील काही भाविकांना रूग्णालयात हलवले आहे. लोहा येथील उपजिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालयात आणि विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. विष्णुपुरी येथे शंभरच्या जवळपास रूग्ण आणि लोहा येथील उपजिल्हा रुग्णालय, खासगी रुग्णालयात जवळपास दोनशेच्या वर रुग्ण सध्या असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे तर अनेकांना किरकोळ त्रास होत आहे.