कडक उन्हाळा सुरू होताचं ग्राहकांची कलिंगडला पसंती, दिंडोरी बाजारपेठेत कलिंगडांची उच्चाकी विक्री...!

कडक उन्हाळा सुरू होताचं ग्राहकांची कलिंगडला पसंती, दिंडोरी बाजारपेठेत कलिंगडांची उच्चाकी विक्री...!

News15 मराठी प्रतिनिधी बापू चव्हाण 

दिंडोरी : मागील काही दिवसांपासून सर्वत्र तापमान दिवसेंदिवस वाढत असल्याने ग्राहक वर्गाकडून कलिंगडाला पसंती देण्यात आली असून सध्या दिंडोरी बाजारपेठेत कलिंगड उपलब्ध झाल्याने ग्राहक वर्गामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

मागील दोन दिवसांपूर्वीच मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सन साजरा झाला असून या सणामध्येही फळांना जास्त मागणी असल्याने या सणानिमित्ताने कलिंगडांची चांगली विक्री झाल्याचे व्यापारी वर्गाकडून व शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. दिंडोरी व वनी पिंपळगाव बाजारपेठेत शेतकरी स्वतः दुकाने थाटून विक्री करीत आहेत. त्यामुळे सध्या तरी कलिंगड उन्हाळ्यात भाव खात आहे. या कलिंगडाची ३० रुपये ते १५० रुपये पर्यंत नगावर विक्री होत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना बऱ्यापैकी पैसे मिळत आहे. 

मात्र असे असले तरी दिंडोरी तालुका हा तसा द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो. परंतु गेल्या काही वर्षांपासून द्राक्ष पिकाची मोठी हानी होत असल्याने द्राक्ष शेती परवडत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी आपल्या द्राक्ष बागेला कुराड लावली आहे. याशिवाय कांद्यानेही वांदा केल्यामुळे शेती पिकांना शाश्वत बाजार भाव मिळत नसल्याने अनेक पिकांमध्ये केलेला खर्च देखील मिळत नसल्याने तरीही शेतकरी जिवावर उदार होऊन दोन पैसे मिळतील या आशा पोटी वेगवेगळे प्रयोग करून आधुनिक शेती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शरीराची लाही लाही होत आहे. त्यामुळे शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी ग्राहकवर्ग कलिंगडला पसंती देत आहे.