आंबेगाव येथे पाण्यासाठी विहीरीत पडलेल्या पाडसाना वन्यजीव रक्षकाकडून जीवदान

आंबेगाव येथे पाण्यासाठी विहीरीत पडलेल्या पाडसाना वन्यजीव रक्षकाकडून जीवदान

प्रतिनिधी - सुधाकर सूर्यवंशी, निलंगा

लातूर : निलंगा तालुक्यातील अंबेगांव शिवारातील वसंत शिंदे यांच्या शेतामध्ये  30 फुट खोलीच्या विहीरीत हरणाचे लहान पाडस पाण्याच्या शोधात विहरीमध्ये पडले होते. हि बातमी वन्य जीव रक्षक निलंगा टीम तांडव हनुमान पाटील, शूभम पाटील, रूषी देशमुख याना समजताच त्यांनी लगेच घटनास्थऴी धाव घेऊन; विहरीमध्ये उतरून त्या पाडसाला सुखरूप बाहेर काढले.

विहरीमध्ये पडल्याने पायाला जखमा झाल्या होत्या.! त्यावर उपचार करून  सोडण्यात आले. शेतकऱ्यांनी शेतीत जागोजागी वन्यप्राण्यांना पाणी ठेवावे जेणे करून त्यांची भंटकंती थांबेल असे आव्हान वन्यजीव प्रेमी यांनी केली आहे.