भाग्यश्री सुडे हिचे अपहरण करून काही नराधमानी तिचा निर्घृण खून

भाग्यश्री सुडे हिचे अपहरण करून काही नराधमानी तिचा निर्घृण खून

आपल्या लातूर जिल्ह्यातील हरंगूळची मुलगी भाग्यश्री सुडे हिचे अपहरण करून काही नराधमानी तिचा निर्घृण खून  करून मृतदेह जाळून पुणे - अहमदनगर राज्य मार्गावरील सुपा परिसरात पुरून देहाची विटंबना करण्यात आली. 

ही अत्यंत संतापजनक आणि हृदयद्रावक माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना फक्त तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर महाराष्ट्रासाठी अतिशय धक्कादायक घटना आहे. या घटनेचा निषेध व्यक्त करून भाग्यश्री सुडे हिचा नराधम मारेकरांना शिक्षा होण्यासाठी आज शुक्रवार १२ एप्रिल रोजी सकाळी लातूर शहरातील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून आयोजित केलेल्या या मोर्च्यात  सुधाकर शृंगारे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, भाजप शहर जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष गणेश गोमसाळे, भाजपा किसान मोर्चाचे प्रदीप पाटील खंडापूरकर ,

भाजपचे अजित पाटील कव्हेकर यांच्यासह विविध जाती धर्मातील नागरिक, महिला, महाविद्यालयीन मुले-मुली मोठ्या संख्येने यात सहभागी झाल्या. यावेळी आमच्या लेकीला न्याय मिळालाच पाहिजे, निष्णात सरकारी वकिलांचे नेमणूक करा, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा असे हजारो फलक घेऊन महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.