महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त; सुधाकर शृंगारे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन
असलम शेख - लातुर
स्त्री सक्षमीकरणासाठी देशात मुलींची पहिली शाळा सुरू करणारे, अंधश्रद्धा आणि अनिष्ट रूढी-परंपरा यांचा विरोध करुन सामाजिक न्यायासाठी लढा देणारे थोर समाजसुधारक, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 197 व्या जयंतीनिमित्त सुधाकर शृंगारे यांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे, भाजप युवा मोर्चा शहर जिल्हाध्यक्ष गणेश गोमचाळे, आदी मान्यवर, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.