शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अँग्रो कंपनीवर ED ची छापेमारी...
![शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अँग्रो कंपनीवर ED ची छापेमारी...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_6597cb57ddc12.jpg)
NEWS15 मराठी विशेष प्रतिनिधी..
पुणे : शरद पवार गटाचे व पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या बारामती अँग्रो या कंपनीवर शुक्रवारी(५ जानेवारी) रोजी सकाळी सक्तवसुली संचालनालयाने(ईडी)छापेमारी करून कंपनीची तपासणी सुरु केली आहे. कंपनीची तपासणी करतेवेळी कंपनीचे प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे.
मागील काही दिवसापूर्वी रोहित पवार यांचे काका अजित पवार हे राज्य सरकारमध्ये सहभागी झाल्याने पवार कुटुंबात मोठी फूट पडली आहे. त्यानंतर रोहित पवार यांनी आजोबा शरद पवार यांची साथ देऊन वेळोवेळी काका अजित पवार यांच्यावर टिका केली आहे. त्यानंतर आमदार रोहित पवार यांच्या कंपन्याना सातत्याने केंद्रीय आणि राज्यातील यंत्रणांनी लक्ष केले जात आहे. मागील वर्षीही रोहित पवार यांना ईडीकडून नोटीस देण्यात आली होती. आता छापेमारीकरुन एकूण ६ कार्यालयाचा ईडी कडुन कसून तपास सुरु आहे.
आमदार रोहित पवार यांच्या कंपनीवर झालेल्या छापेमारीनंतर रोहित पवार यांनी आपल्या एक्स अकाउंट वरुन सूचक वक्तव्य केले आहे. त्यांनी आपल्या अकाउंट वरून म्हंटले आहे की, हा आहे स्वाभिमानी महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांचा चेहरा. ज्यांनी पिढ्यान पिढ्या महाराष्ट्र धर्म जपला आणि वाढवला. अन्यायाविरोधात प्रसंगी संघर्ष करण्याची शिकवनही या महान विभूतीनी दिल्याने महाराष्ट्र भूमिला संघर्षाचाही प्रदीर्घ इतिहास आहे. म्हनून मराठी माणूस या नात्याने महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी आणि टिकवण्यासाठी प्रत्येकाला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल.
आता या छापेमारीत नक्की ईडीच्या काय हाती लागते आणि ईडीकडून आमदार रोहित पवार व कंपनी प्रशासनावर काय कारवाई होते हेच पहावे लागेल.