कृषी सहाय्यक यांच्याकडून जांबुटके येथे महिला शेती शाळेच्या तिसऱ्यावर्गाचे आयोजन
![कृषी सहाय्यक यांच्याकडून जांबुटके येथे महिला शेती शाळेच्या तिसऱ्यावर्गाचे आयोजन](https://news15marathi.com/uploads/images/202407/image_750x_66a514b7b9f58.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील जांबुटके येथे कृषी सहाय्यक रेणुका सातपुते यांच्याकडून नुकतेच महिला शेती शाळेच्या तिसऱ्या वर्गाचा कार्यक्रम संपन्न झाला. राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान सन २०२४-२५ कडधान्य विकास कार्यक्रम सोयाबीन,तुर पीक प्रात्यक्षिके १०.०० हेक्टर क्षेत्रावर कृषी सहाय्यक रेणुका सातपुते राबवित आहेत. या योजनेअंतर्गत गावातील २५ शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर बियाणांचे तसेच इतर निविष्ठाचे वाटप केले असून कीटकनाशकांचे वितरण देखील करण्यात येणार आहे
सदर कार्यक्रमांतर्गत कडधान्य पिक तुर पिकांच्या शेतीशाळेच्या तिसऱ्या वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मंडळ कृषी अधिकारी प्रमोद गोलाईत यांनी दरवर्षी अर्क निंबोळी अर्क जीवामृत तयार करणे व त्याचा वापर याविषयी माहिती दिली.रमाकांत पाटील यांनी एक रुपयात पिक विमा योजना व इतर विविध योजनांची माहिती दिली. पी.डी.जाधव यांनी पी.एम.किसान विषयी माहिती दिली.तसेच मागील झालेल्या शेती शाळेबद्दल चर्चा करण्यात आली त्यानंतर शेती शाळेतील महिलांची बॅलेट चाचणी सांघिक खेळ घेण्यात आला यावेळी अनेक महिलांनी भाग घेऊन प्रतिसाद दिला.प्रत्यक्ष शेतावर जाऊन कीड, रोग ओळख व नियंत्रण याविषयी चर्चा करून निरीक्षणे नोंदविले.शेती शाळेत भाग घेतलेल्या महिलांचे सातपुते यांनी आभार मानले.तर उपविभागीय कृषी अधिकारी अशोक डमाळे तालुका कृषी अधिकारी विजय पाटील मंडल कृषी अधिकारी प्रमोद गोलाईत रमाकांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
याप्रसंगी कृषी सहाय्यक पुष्पा गावित, वैशाली अपसुंदे,निर्मला अपसुंदे,शोभा अपसुंदे,यमुनाबाई ढिकले,जयश्री अपसुंदे,हिराबाई अफसुंदे,मिराबाई अपसुंदे,पूजा अपसुंदे, सुरेखा पगार,गायत्री पगार,मीना पगार,अनिता बेजेकर,सरला बेजेकर, सुनंदा अपसुंदे,नूतन बेजेकर रोहिणी अपसुंदे,रंजना नाठे,आदींसह शेतकरी बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.