सम्राट मित्र मंडळाच्यावतीने मध्यरात्री 133 तोफांची सलामी देऊन बाबासाहेबांना अभिवादन...

सम्राट मित्र मंडळाच्यावतीने मध्यरात्री 133 तोफांची सलामी देऊन बाबासाहेबांना अभिवादन...

प्रतिनिधी - असलम शेख, लातूर

भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंतीच्या निमित्ताने अहमदपुर येथील सम्राट मित्र मंडळाच्या वतीने मध्यरात्री बारा वाजता 133 तोफांची सलामी देऊन अनोख्या पद्धतीने अभिवादन केले.

प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी आतिषबाजी आणि तोफांची सलामी हा उपक्रम सम्राट मित्र मंडळाच्या वतीने घेण्यात आला याप्रसंगी पुतळा समितीचे अध्यक्ष माजी आ. बब्रूवानजी खंदाडे, प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील, माजी मंत्री विनायकराव जाधव पाटील जयंती मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत बनसोडे माजी नगराध्यक्षा सरस्वती कांबळे आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

मध्यरात्री ठीक बारा वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले सोबतच कोल्ड फायर आणि फटाक्यांची आतिषबाजी करत 133 तोफांची सलामी देण्यात आली याप्रसंगी सम्राट मित्र मंडळाचे अध्यक्ष संयोजक तथा माजी नगरसेवक डॉ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी  व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिन बानाटे, पत्रकार अजय भालेराव,डॉ.बालाजी थिट्टे, सिध्दार्थ वाघमारे, अनिल तिगोटे,

सुनिल तिगोटे, संविधान कदम,रवि बनसोडे, पत्रकार शिवाजी गायकवाड, भिमराव कांबळे, गणेश मुंडे, संतोष गायकवाड,संभाजी जाभाडे, अभिजित सोनकांबळे, सिद्धार्थ (डॉन )वाघमारे, सतीश कदम,अनिल वाघमारे, सावळाराम बनसोडे,सुनील गायकवाड,मिलिंद कदम,दिलीप सोनकांबळे,सोनू कांबळे,सुनील तिगोटे, रोहिदास तिगोटे, सुशील कदम,राजू गूळवे, अभिषेक ससाणे, विट्टल ससाणे, सुनील ससाणे,राजवीर मतकर,राहुल वाघमारे,अजय भलेराव,पुंडलिक सनकांबळे,दिनेश तिगोटे,राजधानी सोनकांबळे,सुरेश बनसोडे, रायभोळे रितेश,शुभम नावंदे, विशाल वाघमारे, साईनाथ कांबळे, आकाश वाघमारे, जय गुळवे, अभय गुळवे,सुमित बनसोडे,सिद्धार्थ लांडगे,सतीश बनसोडे,विशाल शिंदे,राहुल कांबळे, सुशील नवरंगे, सोनू सोनकांबळे, सुरज सोनकांबळे,सुजल सोनकांबळे,आदींची प्रमुख उपस्थिती होती.