खडकसुक्यान्याला ९ रोजी गुढीपाडवा निमित्त शिवचरित्रकार यशवंत गोसावी यांचे व्याख्यान

खडकसुक्यान्याला ९ रोजी गुढीपाडवा निमित्त शिवचरित्रकार यशवंत गोसावी यांचे  व्याख्यान

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील खडक सुकेने येथे उद्या मंगळवार दि.९ रोजी गुढीपाडवा व नवीन मराठी वर्षा निमित्ताने शिवनिच्छल सेवाभावी ट्रस्टचे संपादक अध्यक्ष व महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवचरित्रकार, शिवव्याख्याते, प्रा.यशवंत गोसावी यांचा सायं.७ वा.जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

तरी परिसरातील श्रोत्यांनी या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन माऊली शेतकरी बचत गट, ज्ञानेश्वर माऊली शेतकरी बचत गट, विठू माऊली शेतकरी बचत गट, माऊली शेतकरी महिला बचत गट, कादवा पाणी वापर संस्था, व ग्रामपंचायत यांनी केले आहे.