आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली, हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत कावड यात्रेचे आयोजन...

आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली, हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत कावड यात्रेचे आयोजन...

प्रतिनिधी - नारायण काळे, हिंगोली

हिंगोलीच्या कळमनुरी येथील चिंचाळेश्वर महादेव मंदिर पासून, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर दुसऱ्या श्रावण सोमवारी १८ किलोमीटर अंतर पाय चालत हिंगोलीतील ओम कयाधु अमृतधारा महादेव मंदिरा पर्यंत दि. १२ ऑगस्ट रोजी आमदार संतोष बांगर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

चिंचाळेश्वर महादेव मंदिरात आरती करुन दुपारी १ वाजण्याच्या सुमारास हिंगोली - नांदेड राष्ट्रीय महामार्गावरुन शहरातून ढोल ताशाच्या गजरात हर हर महादेव बमबम भोलेच्या जयघोष करत; संपूर्ण राष्ट्रीय महामार्गा दुमदुमुन गेले होते. पाच वाजण्याच्या सुमारास हिंगोलीतील खटकाळी बायपासवर कावड यात्रा  पोहोचल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यात्रेत सामिल झाले.

हि कावड यात्रा नांदेड नाका येथे पोहचल्यानंतर; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित शिवभक्तांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार संतोष बांगर यांचे भरभरून कौतुक केले.