सलगरा खुर्द येथील मंदिरातील मुर्तीची चोरी
![सलगरा खुर्द येथील मंदिरातील मुर्तीची चोरी](https://news15marathi.com/uploads/images/202404/image_750x_661415fa4d494.jpg)
सुधाकर सूर्यवंशी, शिरूर अनंतपाळ ( लातूर )
शिरूर अनंतपाळ ते लातूर रस्त्यावरील सलगरा खुर्दे शिवारातील महादेव मंदिरातील महादेवाची मुर्ती चोरट्यानी चोरी केल्याची घटना घडली असून एक महिन्यापासून पोलीसांना चोर सापडलेला नाही .
हिवो : - सलगरा खुर्द येथे लातूर रस्त्यावर भव्य असे महादेव मंदिर असून येथे मोठ्या संख्येने भावीक भक्त येत असतात . दरवर्षी या ठिकाती सप्ताहासह विविध धार्मिक कार्यक्रम होत असतात . या नवसाला पावणाऱ्या मंदिरातील सोन्याचा मुलामा दिलेली महादेवाच्या मुर्तीची चोरी झालेली आहे . याबाबत मंदिर कमेटीने तथा पुजारी यांनी रितसर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिलेली असून त्यात रितसर अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे .