मोळवण येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या..!

मोळवण येथे कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या..!

News15 मराठी प्रतिनिधी असलम शेख 

लातूर : अहमदपूर तालुक्यातील मोळवण येथे कर्जबाजारी शेतकऱ्यानी स्वतःच्या शेतातील बिब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

सुदाकर व्यंकटी दहीफळे वय ५२ वर्षे रा.मोळवण यांना दि.१३ मार्च रोजी बुधवारी संध्याकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास स्वतःच्या शेतात बिब्याच्या झाडास कर्जाच्या विवेचणेतून गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची समजते. या शेतकऱ्यास दीड एकर शेती असून पत्नी दोन मुल कंस,दिपक व दोन मुली असा परिवार आहे. या बाबत किनगाव पोलीसात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.