पुजा कासले झाली महसूल विभागात तलाठी.! मानखेड ग्रामस्थांकडून सत्कार...
![पुजा कासले झाली महसूल विभागात तलाठी.! मानखेड ग्रामस्थांकडून सत्कार...](https://news15marathi.com/uploads/images/202402/image_750x_65c31f17410d7.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - असलम शेख, लातूर
अहमदपूर तालुक्यातील मौजे मानखेड येथील तरुणी कु. पुजा ज्ञानेश्वर कासले हीची नुकतीच तलाठी म्हणून निवड झाली असल्याने; मानखेड ग्रामस्थांनी पुजा कासले यांचा सत्कार करुन बहुमान केला आहे.
पुजा ही एका हाताने अपंग असताना देखील; परीस्थितीवर मात करून जिद्द व चिकाटीने अभ्यास करून तलाठी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून, लातूर जिल्ह्याधिकारी कार्यालया अंतर्गत तलाठी म्हणून रुजू होणार असल्याने.! मानखेड ग्रामस्थांच्यावतीने भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद गिरी, ज्ञानेश्वर कासले, प्रा. भीमाशंकर रोडगे, लिंबराज मुरकुटे, जिलानी शेख, दस्तगीर शेख, प्रा.उमाकांत कांबळे, बालाजी गिरी, ज्ञानेश्वर गव्हाणे, बंडू बडगिरे, मुंडे सर, आदित्य गिरी आदिसह मानखेड ग्रामस्थांनी पुजा कासले हीची सत्कार केला.