BIG BREAKING : केंद्र सरकारची लोकशाही चॅनेल विरोधात दडपशाही! चॅनेल बंद करण्याचे आदेश...

BIG BREAKING : केंद्र सरकारची लोकशाही चॅनेल विरोधात दडपशाही! चॅनेल बंद करण्याचे आदेश...

News15 मराठी ब्युरो रिपोर्ट..

मुंबई : लोकशाही मराठी चॅनेल बंद करण्याचे आदेश माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून देण्यात आलं आहे. आज(दि.९)सहा वाजेपासून चॅनेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाकडून चॅनेलचं लायन्सस ३० दिवसांसाठी निलंबित करण्यात आले आहे. लोकशाही मराठीने एक भूमिका मांडली. स्पष्टपणे, निर्भिडपणे पत्रकारीता करण्याचे काम लोकशाहीने केली आहे. या २६ जानेवारी रोजी लोकशाही मराठी चौथा वर्धापन दिन साजरा करणार होते. पण, गेले काही दिवस वारंवार माहिती आणि प्रसारण मंत्रालय खात्याकडून नोटीस देण्यात येत होत्या. १४ जुलै २०२३ रोजी एक बातमी दाखवली होती. आम्हाला ७२ तास चॅनेल बंद करण्याची नोटीस आली होती. यानंतर दिल्ली हायकोर्टात याविरोधात आम्ही अपील केले होते. यानंतर आमच्यावरील बंदी काढून घेतली होती. पण, आता पुन्हा एकदा लोकशाही मराठीचं लायन्सस रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

चार महिन्यांपूर्वी प्रसारण खात्याने आमच्याकडून माहिती मागवली होती अचानकपणे वेगवेगळी माहिती मागविण्यात आली.

यामध्ये लायन्ससबाबत प्रश्न उपस्थित करत लोकशाही मराठी बंद करण्याचे काही मिनिटांपूर्वी आदेश दिले आहेत. न्यायालयीन लढाई आम्ही लढूच. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच चॅनेल बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयाचा सर्व महाराष्ट्रातून निषेध नोंदविण्यात येतं आहे. माध्यमाना माध्यमाचे काम करू दिले जात नसेल तर कुठे लोकशाही नक्कीच धोक्यात आल्याचे दिसून येतं आहे.