पत्रकार दिनानिमित्त रुग्णांना फळ आणि बिस्केटचे वाटप...
![पत्रकार दिनानिमित्त रुग्णांना फळ आणि बिस्केटचे वाटप...](https://news15marathi.com/uploads/images/202401/image_750x_659a33bdc134d.jpg)
NEWS15 मराठी प्रतिनिधी - साहिल रामटेके, गोंदिया
गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी/मोरगाव येथिल कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये; काल दि.६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार संघ तालुका अर्जुनी/मोरगाव'च्यावतीने, मराठी पत्रकारितेचे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर अर्जुनी/मोरगाव ग्रामीण रुग्णालयात भरती असलेल्या 30 रुग्णांना फळ आणि बिस्केटचे वाटप करुन पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी अर्जुनी/मोरगावचे उपविभागीय अधिकारी वरुणकुमार सहारे, तहसीलदार अनिरुद्ध कांबळे, कृषि उत्पन्न बाजार समितिचे सभापती यशवंत परशुरामकर तसेच इतर पत्रकार बांधवही उपस्थित होते.