विसर्जनाकरिता प्रशासनाची जय्यत तयारी...
![विसर्जनाकरिता प्रशासनाची जय्यत तयारी...](https://news15marathi.com/uploads/images/202409/image_750x_66deffd2dc605.jpg)
प्रतिनिधी - गजू कैलासवार, पाटणबोरी (यवतमाळ)
विघ्नहर्ता गणेशाचे आगमन झालेले आहे. पाटणबोरी गावामध्ये गणेशाची अनेक मंडळे आहेत. बाप्पांचे विसर्जन सुद्धा आता पुढील काही दिवसात होणार आहे. त्यामुळे गाव पातळीवरील पोलीस प्रशासन व टीम ने गावात एक आढावा घेतला.गणेश विसर्जनाचे मार्ग,जिथे मंडळाची स्थापना झालेली आहे ती मंडळे ठिकाणे,नदीवरील विसर्जनाची ठिकाणे याबाबत संपूर्ण माहिती घेऊन आढावा घेण्यात आला.
दुरक्षेत्र पाटणबोरी येथील गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी करण्यात आली.यामध्ये MSEB कडून कनिष्ठ अभियंता श्रीमती नोमुलवार, वरिष्ठ तंत्रज्ञ श्री. झोटिंग, महसूल प्रशासनाकडून तलाठी धुंड्रावार, सरपंच श्रीमती नीता उप्परवार, उपसरपंच कपिल दरवरे उपस्थित होते, मिरवणूक पाहणी दरम्यान शहरातील मिरवणुकीला अडथळा निर्माण करू शकणाऱ्या इलेक्ट्रिक तारांना व्यवस्थित करणे बाबत MSEB च्या अधिकारी व कर्मचारी यांना सुचित करण्यात आले तसेच सरपंच व /उपसरपंच यांना मिरवणूक मार्गातील शहरातील खड्डे बुजविण्या संदर्भात व ईतर सुविधांसंदर्भात सूचित करण्यात आले. पोलीस प्रशासनातर्फे सपोनी रमाकांत खंदारे, कॉन्स्टेबल किशोर आडे, विजय चव्हाण हे उपस्थित होते.