उमरखेड तालुक्यात पावसाचे थैमान.! शेकडो घरे पाण्याखाली

उमरखेड तालुक्यात पावसाचे थैमान.! शेकडो घरे पाण्याखाली

प्रतिनिधी - किरण मुक्कावार, यवतमाळ

उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील चिखली, कोर्टा व दराटी या गावातील शेकडो घरे पाण्याखाली गेली असुन हजारो हेक्टर शेत जमिनीतील पिके उध्वस्त झाले आहे.

तालुक्यात दोन दिवसापासून  ढगफुटी सदृश्य पावसाने थैमान घातले या पावसात तालुक्यातील पैनगंगा अभयारण्य म्हणून ओळखत असलेल्या  चिखली, कोर्टा व दराटी या गावातील नाल्याकाठ्यातील शेकडो घरात पाणी घुसल्याने अनेक घराच्या पडझडीसह घरातील अन्न धान्य सहित भांडे वाहून गेले तर या नाल्याच्या पुरात एक म्हैस वाहून गेली आहे एवढेच नव्हे तर सतत धार पावसामुळे पैनगंगा अभयारण्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गावातील हजारो कापूस तूर व सोयाबीन पिके उद्ध्वस्त झाल्याने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे

चिखली येथील 50 ते 60 घरे, कोर्टा येथील  60 ते 70 घरे पाण्याखाली आल्याने घरातील अन्नधान्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असून काही नागरिकांनी गावातील मंदिराकडे धाव घेतली तर अनेकांनी बाजा घराला टांगून कशीबशी रात्र जागून काढली, असून कोर्टा प्राथमिक आरोग्य केंद्रालाही  चारही बाजूंनी पाण्याने वेढा घातला आहे. परंतु बंदी भागात असलेल्या

दराटी पोलिसांचे  या पूरग्रस्त भागाकडे दुर्लक्ष केले असून महसूल विभागाचे सुद्धा जितकी लक्ष पाहिजे तेवढे नसल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडत आहे.