जयश्री केंग यांना गोदा कन्या पुरस्कार.! जानोरी ग्रामपंचायतच्यावतीने सत्कार

जयश्री केंग यांना गोदा कन्या पुरस्कार.! जानोरी ग्रामपंचायतच्यावतीने सत्कार

प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

महिला व बाल विकास विभाग जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून "बेटी_बचाव.! बेटी_पढाव" अंतर्गत जानोरी येथील अंगणवाडी मदतनीस जयश्री अशोक केंग यांनी उत्कृष्ट काम केल्याबद्दल जिल्हा परिषद नाशिक यांच्याकडून गोदाकन्या पुरस्कार मिळाल्याने जानोरी ग्रामपंचायत तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

दिंडोरी तालुक्यातील निगडोळं बीटातीलचारोसा येथिल अंगणवाडी सेविका शशिकला मोगल व मोहाडी बिटातील जानोरी येथील जानोरी अंगणवाडी क्र. १० च्या मदतनीस; जयश्री अशोक केंग हिने उत्कृष्ट काम केल्यामुळे दिंडोरी तालुक्यातून त्यांची निवड करण्यात आली. महिला बाल विकास विभाग नाशिक यांच्याकडून व मुख्य कार्यकारी अधिकारी अस्मिता मित्तल यांच्या हस्ते गोदाकन्या पुरस्कार देण्यात आल्याने जानोरी ग्रामपंचायत तर्फे जयश्री केंग यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी जानोरी ग्रामपंचायतला नविन ग्रामविकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे ही सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुरस्काराबद्दल विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, केंद्रीय आरोग्य मंत्री भारतीताई पवार, कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे, भास्कर भगरे तसेच दिंडोरी बालविकास प्रकल्प अधिकारी विलास कवळे, वदंना पाटील यांनी अभिनंदन केले.

तसेच सत्कार प्रसंगी ग्रामपंचायतचे सरपंच सुभाष नेहरे, उपसरपंच हर्षल काठे, ग्रामविकास अधिकारी नाना खांडेकर, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.