मुख्यमंत्री 'माझी शाळा.! सुंदर शाळा' स्पर्धेत जऊळके दिंडोरी विभागात प्रथम..
![मुख्यमंत्री 'माझी शाळा.! सुंदर शाळा' स्पर्धेत जऊळके दिंडोरी विभागात प्रथम..](https://news15marathi.com/uploads/images/202403/image_750x_65e851cdf02b8.jpg)
प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
मुख्यमंत्री 'माझी शाळा.! सुंदर शाळा' स्पर्धेत नाशिक विभागात शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा गटात जऊळके दिंडोरी ता. दिंडोरी शाळेने प्रथम क्रमांक पटकावला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते जऊळके दिंडोरी शाळेला २१ लाखाचा धनादेश प्रदान करण्यात आलाय.
या स्पर्धेचे पारितोषिक वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत; मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देवल, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, विधान परिषद सदस्य कपिल पाटील, विक्रम काळेयावेळी उपस्थित होते.
शाळांमध्ये भौतिक सुविधा शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणांच्या आधारे जिल्ह्यातील शाळांचे परीक्षण करण्यात आले. यामध्ये स्पर्धेमध्ये शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी सहभाग नोंदवला होता.
जऊळके दिंडोरी शाळेला प्रथम पारितोषिक मिळाल्याबद्दल.! जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी जऊळके दिंडोरी शाळेच्या मुख्याध्यापिका, सरपंच भारती जोंधळे, उपसरपंच तुकाराम जोंधळे, संगीता जोपळे, शिक्षक किरण कापसे, कमल देवरे, कल्याणी वाशीकर, उत्तम भोये, हरिभाऊ बच्छाव, नरेंद्र सोनवणे, सुप्रिया धोंडगे आदींसह विद्यार्थी व पालक व ग्रामस्थांचे अभिनंदन केले.