उदगीर जमहुर उर्दू शाळेला लागली भ्रष्टाचाराची किड.! ८० विद्यार्थ्यांचे दाखवले बोगस प्रवेश, शासनाची'ही लूट...

उदगीर जमहुर उर्दू शाळेला लागली भ्रष्टाचाराची किड.! ८० विद्यार्थ्यांचे दाखवले बोगस प्रवेश, शासनाची'ही लूट...

NEWS15 प्रतिनिधी - सलम शेख

लातूर : जमहूर उर्दू प्राथमिक शाळा चर्च रोड उदगीरच्या मुख्याध्यापिका हाशमी सय्यदा शहाजहाॅं सय्यद आरिफ व सदर शाळेच्या सचिव कादरी अंजुम फातिमा या दोघांनी संगणमत करून, अस्तित्वात नसलेल्या एकूण ८o मुलांचे बोगस नावे शाळेच्या प्रवेश पंजिकेत व विद्यार्थी हजेरी पटात नोंद करून, त्या आधारे शासनाकडून येणाऱ्या भौतिक व आर्थिक सुविधा म्हणजे तांदूळ, तेल, हरभरा, डाळ व पुस्तके इत्यादी येणारे धान्यमाल व पुस्तके स्वतःच्या फायद्यासाठी वापरत; शासनाची फसवणूक केली आहे. खोट्या नावाच्या विद्यार्थ्यांची संख्या दाखवून, स्वतःचा फायदा व नोकरीस संरक्षण मिळवून या दोघांनी संगणमत करून शासनाला लाखो रूपयांचा गंडा घातला आहे.

सदर प्रकरण अनेक वर्षापासून चालू होते. सदरची प्रकरण कोणत्या वर्षापासून चालू आहे याची चौकशी करून, दुप्पट व्याजासह रक्कम वसूल करून, मुख्याध्यापिका व सचिव यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करावे अशी तक्रार शिक्षण मंत्री मंत्रालय मुंबई व शिक्षण संचालक पुणे येथे दि. १ मार्च २०२३ पासून आझाद मैदान मुंबई येथे अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्यावतीने बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमदरफी यांनी दि.१५ फेब्रुवारी २०२३ रोजी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १८ च्या प्रयोजनार्थ नियम १८ (ड) चा भंग  केल्याने कलम १२ (3) व १८ (3) ख नुसार चौकशी समिती गठित करून शासन निर्णय दिनांक १८/४/२०१३ नुसार शाळेची मान्यता काढण्याची कारवाई शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद लातूर यांनी नियमानुसार करावी असे आदेश डॉ.गणपत मोरे विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर यांनी दिले आदेश.