कादवा विद्यालयात कीर्ती वक्ते प्रथम...

कादवा विद्यालयात कीर्ती वक्ते प्रथम...

NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक

दिंडोरी तालुक्यातील  रा.स. वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेच्या कादवा इंग्लिश स्कूल लखमापूर विद्यालयाचा शालांत परीक्षा २०२४ एस.एस.सी. चा निकाल ९४.७३% लागला. विद्यालयात एकूण १३३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झालेले होते.त्यापैकी १२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

प्रथम क्र. वक्ते कीर्ती संतोष (९०.२०%) द्वितीय क्रमांक  कुमार सुयश देवकर (८७.८०%) तृतीय क्रमांक  दळवी कृष्णा (८७.८०87%) तृतीय क्रमांक कुमारी  शेळके श्वेता (८६.८०%) चौथा क्रमांक कुमारी जाधव तनुजा( ८६.०० %) पाचवा क्रमांक कुमारी देवकर ऋतुजा (८५.८०%) याप्रमाणे विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे मार्गदर्शक कादवा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे  संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी, सचिव बाळासाहेब उगले व संस्थेचे सर्व संचालक,मुख्याध्यापिका श्रीम.  व्ही.आर.जाधव यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.