जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडवस्ती येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या वारीचे औचित्य साधून शाळेत दिंडीचे आयोजन...!

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडवस्ती येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीच्या वारीचे औचित्य साधून शाळेत दिंडीचे आयोजन...!

News15 मराठी प्रतिंनिधी सुनील बटवाल

चाकण(चिंबळी): जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडवस्ती (कुरुळी) येथे आषाढी एकादशीच्या पंढरीच्या वारीचे औचित्य साधून शाळेत दिंडीचे आयोजन करण्यात आले.

कुरूळी (कडवस्ती) येथील जिल्ह परिषद प्राथमिक शाळेतील  विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशभुषेत टाळकरी, ध्वजपताकाधारी, डोक्यावर तुळस घेतलेली छोटीशी रखुमाई, वारकरी अशा वेगवेगळ्या वेशभूषा सादर करून ज्ञानोबा तुकारामाच्या गजरात तल्लीन होऊन सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षिका  व पालकही आनंदाने या पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते.