पालखेड विद्यालयात मान्यवरांकडून, शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार...
NEWS15 मराठी प्रतिनिधी - बापू चव्हाण, नाशिक
दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील न्यू इंग्लिश माध्यमिक विद्यालयात; शिक्षक दिनानिमित्त मान्यवरांच्याहस्ते शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
दरवर्षी 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्म-दिवसाच्या निमित्ताने व शिक्षकांप्रती सन्मान प्रकट करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 'गुरु' यांचे प्रत्येकाच्या जीवनात महत्त्व असतं.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब गायकवाड हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रेखा गांगुर्डे, सोसायटी चे चेअरमन नाना गायकवाड, रघुनाथ गायकवाड आदी उपस्थित होते. यावेळी मुख्याध्यापक एम. व्ही. बोराडे यांनी शिक्षक दिनानिमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी एस. पी. वाघ, श्रीमती एस. एस. गांगुर्डे, टी. एम. देशमुख, कर्मचारी तुषार मिठे, संजय जाधव उपस्थित होते.